नववर्षाच्या स्वागताला विदेशी पाहुण्याचा सहभाग  

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 मार्च 2018

गुढीपाडव्याचा उत्साह नाशिक, नागपूर आणि अमरावतीत पाहायला मिळाला. नाशिकमध्येही मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रंथ दिडीचंही आयोजन करण्यात आलंय. पारंपारिक वेशभुषेत महिलांनी बाईकवर स्वार होत नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी विदेशी पाहूणेही यात सहभागी झाले होते. दरम्यान तिकडे नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त ढोल पथकांनी ताल धरला होता. थरारणारा आवाज आणि भारावून टाकणाऱ्या ढोल ताशाच्या आवाजानं आसमंत दणाणून गेला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी अमरावतीमध्ये 'पाडवा पहाट' या विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या

Saam TV Live