हिंदू नववर्षांच्या स्वागतात न्हाऊन निघालं अवघे ठाणे शहर  

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 मार्च 2018

हिंदू नववर्षांच्या स्वागतात अवघे ठाणे न्हाऊन निघालं.. स्वागतयात्रांतून नववर्षांचा जल्लोष ठाण्यात साजरा करण्यात आला.  स्वागतयात्रेतून मराठी संस्कृतीचे दर्शनही घडवण्यात आलं. कौपीनेश्वर मंदिरात महापौरांच्या हस्ते शिवपूजन झाल्यानंतर पालखीसह शोभायात्रेला सुरुवात झाली. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात भव्य रांगोळ्याही काढण्यात आल्यात. शोभायात्रेमध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. दरम्यान, ठाण्यात नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर फुलांची बरसात करण्यात आली. ठाण्यात काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेची सांगता तालावपाळीमार्गे गडकरी रंगायतन येथे झाली.

संबंधित बातम्या

Saam TV Live