MONSOON | मनमाडमध्ये पावसाचं थैमान! वागदरडी धरण ओवारफ्लो

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मनमाड- शहर व परिसरात रात्रभर बरसत असलेल्या मुसळधार पावसाने .रेल्वे बंधारा व शहराला पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण ओवर फ्लो झाल्याने शहरातून वाहणाऱ्या रामगूळणा व पांझण या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला असून , पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या टकार मोहला ,गुरुद्वाराच्या पाठी मागची वस्ती,इदगाह ,गवळी वाडा ,आंबेडकर चौक  परिसरातील नागरी वस्तीत  पुराचे पाणी घुसले तर काही टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या .बुधलवाडी ,शिवाजी नगर,हुडको या भागाचा शहराशी तुटला संपर्क आहे . त्यातच वीज पुरवठा खंडीत झाल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या.

मनमाड- शहर व परिसरात रात्रभर बरसत असलेल्या मुसळधार पावसाने .रेल्वे बंधारा व शहराला पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण ओवर फ्लो झाल्याने शहरातून वाहणाऱ्या रामगूळणा व पांझण या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला असून , पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या टकार मोहला ,गुरुद्वाराच्या पाठी मागची वस्ती,इदगाह ,गवळी वाडा ,आंबेडकर चौक  परिसरातील नागरी वस्तीत  पुराचे पाणी घुसले तर काही टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या .बुधलवाडी ,शिवाजी नगर,हुडको या भागाचा शहराशी तुटला संपर्क आहे . त्यातच वीज पुरवठा खंडीत झाल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. काही तरुणांनी जीव धोक्यात घालून नागरिकांना पुराच्या पाण्यातूनबाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. जीवित हानी झाली नसली तरी अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या .तब्बल 12 वर्षा नंतर दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू वाहत आहे.

Web Title: marathi news rain in manmad


संबंधित बातम्या

Saam TV Live