साहित्य संमेलनातील वादाचा नवा अंक..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 जानेवारी 2019

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भोवती घोंगावणारं वादाचं वादळ, काही शमताना दिसत नाहीए. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या राजीनाम्यामुळे आज या वादाचा नवा अंक सुरु झालाय.

साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झालेल्या श्रीपाद जोशी यांनी राजीनामा देताना, मला खलनायक केलं गेलं असा आरोप केला. शिवाय, ज्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण रद्द करण्यावरुन हा वाद उद्भवला, त्यांची आपण भेट घेणार असल्याचंही जाहीर केलं. 

या सगळ्या वादावर यवतमाळ कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे.

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरुन सुरु झालेला हा वाद आता साहित्य महामंडळातील अंतर्गत मतभेदांपर्यंत येऊन पोहोचला आहे. या वादामुळे पुढे काय साध्य होईल, अथवा निष्पन्न होईल माहीत नाही. पण सध्या या वादाने ९२ मराठी साहित्य संमेलनासाठी उत्सुक साहित्यप्रेमींच्या पदरी मात्र निराशाच दिली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live