उद्या सकाळी 10 वाजता जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

नाशिकच्या गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणांमधून जायकवाडीला उद्या सकाळी 10 वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मुळा धरणातून एक हजार 900 दशलक्ष घनफूट पाणी 'जायकवाडी'ला सोडण्याचा आदेश आहेत.

मुळा नदीत दोन हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होईल. टप्प्याटप्प्याने तो सहा हजार क्‍यूसेकपर्यंत वाढविला जाईल. नदीतील पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी 'जायकवाडी'चे अधिकारी येणार आहेत.

नदीकाठच्या शेतकऱ्यांनी त्यांचे वीजपंप काढून घ्यावेत. नदीत कोणीही उतरू नये, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे. तसंच, निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येण्याची दाट शक्यताय.

दुसरीकडे मात्र जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध वाढत जातोय. पाणी सोडण्यासाठी होणारा आंदोलकांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

WebTitle : marathi news marathwada drought jayakwadi dam water shortage 

संबंधित बातम्या

Saam TV Live