मराठवाड्यासह विदर्भातही अवकाळीचा कहर सुरुच आहे. 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 एप्रिल 2018

मराठवाड्यासह विदर्भातही अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातलाय.. या जोरदार पावसामुळे तीन जनावरांचा मृत्यू झालाय.. भंगार चिंचोली इथले जीवन नाईकवाडे यांच्या एका म्हैशीचा मृत्यू झालाय. तर निलंगा तालुक्यातले बालाजी डोरले आणि दिलीप पाटील या दोघांच्या गायींचाही वीज पडून मृत्यू झालाय. नांदेडमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये चौघांचा जीव घेतलाय.

मराठवाड्यासह विदर्भातही अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातलाय.. या जोरदार पावसामुळे तीन जनावरांचा मृत्यू झालाय.. भंगार चिंचोली इथले जीवन नाईकवाडे यांच्या एका म्हैशीचा मृत्यू झालाय. तर निलंगा तालुक्यातले बालाजी डोरले आणि दिलीप पाटील या दोघांच्या गायींचाही वीज पडून मृत्यू झालाय. नांदेडमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात फळबागांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने यवतमाळमध्ये चौघांचा जीव घेतलाय. पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live