जे जे मधील डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 मे 2018

जे जे मधील डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरू असून रुग्णांचे हाल काही संपायची चिन्हं दिसत नाहीत. शनिवारी रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी दोन ड़ॉक्टरांना बेदम मारहाण करत, साहित्याची नासधूस केली होती. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारलय. प्रत्येक वॉर्डाच सुरक्षा रक्षक नेमावा, तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेची रुग्णालय प्रशासनाने हमी द्व्यावी या मागण्यांवर आंदोलक डॉक्टर ठाम आहेत. दरम्यान, या आंदोलनाचा रुग्णांना फटका बसू नये याकरता काही काळापूरतं डॉक्टरांनी समांतर ओपीडीसुद्धा सुरु केली होती.

जे जे मधील डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरू असून रुग्णांचे हाल काही संपायची चिन्हं दिसत नाहीत. शनिवारी रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी दोन ड़ॉक्टरांना बेदम मारहाण करत, साहित्याची नासधूस केली होती. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारलय. प्रत्येक वॉर्डाच सुरक्षा रक्षक नेमावा, तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेची रुग्णालय प्रशासनाने हमी द्व्यावी या मागण्यांवर आंदोलक डॉक्टर ठाम आहेत. दरम्यान, या आंदोलनाचा रुग्णांना फटका बसू नये याकरता काही काळापूरतं डॉक्टरांनी समांतर ओपीडीसुद्धा सुरु केली होती. मात्र, त्यानंतर सर्वच कामं बंद करुन, तोंडाला काळ्या पट्ट्या बांधत रुग्णालयाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय आंदोलक डॉक्टरांनी घेतलाय. दरम्यान या संपकरी डॉक्टरांचं शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्याकरता गेलं आहे.. 


संबंधित बातम्या

Saam TV Live