टिळ्याला गेला आणि नवरीघेऊन आला; एका लग्नाची भन्नाट कहाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 मार्च 2020

किरकटवाडी (पुणे) : लग्न म्हटलं की मानपान, बडेजाव, जेवणासाठी अगणित पदार्थांची रेलचेल, महिन्या दोन महिन्याची लग्नासाठी केलेली तयारी दाखवण्याचा दिवस असं चित्र आपल्या डोळ्यापुढे निर्माण होतं जे सध्याचं वास्तव आहे. परंतु, कात्रज येथील एका सुशिक्षित तरुणाने आणि त्याच्या परिवाराने मनाचा मोठेपणा दाखवत मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन टिळ्याच्या कार्यक्रमात लग्नच उरकून घेउन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कात्रज येथे राहणाऱ्या सुमंत अशोक पवार या एमबीए करून कोथरूड येथे नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या तरुणाचा गोऱ्हे बुद्रुक येथे राहणाऱ्या विशाखा राजेंद्र शिळीमकर या बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीशी  टिळयाचा कार्यक्रम ठरला होता. मुलीचे वडील टेम्पो चालवतात तर आई मोलमजुरी करते; त्यामुळे मुलीचे मामा ह.भ.प. ज्ञानेश्वर उर्फ दादा महाराज खिरिड यांनी टिळ्याचा खर्च करण्याची जबाबदारी घेतली व आपल्या घरापुढे मंडप टाकून टिळा करण्याचे ठरवले.

मुलाला व मुलाच्या घरच्यांना मुलीच्या वडिलांची पूर्ण परिस्थिती माहिती होती. मामाच्या दारातील मंडप पाहून मुलगा व मुलाकडील मंडळी म्हटले की एवढी तयारी केली आहे तर टिळ्याऐवजी साखरपुडा करून घेऊ; यावर मुलीच्या मामांनी एक पाऊल पुढे टाकत टिळा काय लग्नच लावून देतो! असे म्हणत नवा पर्याय दिला. मुलानेही क्षणाचाही विलंब न लावता लग्नाची तयारी दर्शवली. मुलाच्या निर्णयाने दोन्ही बाजूच्या मंडळींना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. टिळ्याची तयारी लग्नात रूपांतरित झाली. कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली. कोणी मंगळसूत्र आणायला गेले, कोणी गरजेची मानपानाची खरेदी केली तर कोणी अक्षदा तयार केल्या.तोपर्यंत टिळ्याचा विधी करण्यासाठी आलेल्या काकांनी दोन्ही परिवारांची तयारी पाहून संध्याकाळी साडेसहा चा लग्नाचा शुभ मुहूर्त काढला. साखरपुडा उरकला, थोड्यावेळात हळदही लागली आणि संध्याकाळी मुहूर्तावर लग्नही लागले. मामानींही मनाचा मोठेपणा दाखवत आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी संध्याकाळच्या जेवणाचीही व्यवस्था तातडीने करून घेतली. टिळ्याला आलेली मंडळी जाताना थेट नवरीच घेऊन गेल्याने परिसरातही या अनाहूतपणे घडलेल्या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली. सुमंत अशोक पवार हा नवरदेव नवरी बरोबरच पाठीवर उपस्थितांच्या कौतुकाची थाप  घेऊन व चंगळवादाकडे झुकत चाललेल्या समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करून गेला.

हा विवाहसोहळा पार पाडण्यासाठी युवासेना जिल्हा समन्वयक सुशांत खिरीड, गोऱ्हे बुद्रुकचे माजी सरपंच सचिन पासलकर पै. अमर खिरीड, गोऱ्हेकर संस्थेचे सचिव जनार्दन खिरीड, सरपंच लहु खिरीड, कुंडलिक खिरीड, तुकाराम खिरीड यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title Married Get Low Cost In Katraj pune

संबंधित बातम्या

Saam TV Live