मेरी कोम तब्बल सहाव्यांदा जगज्जेती; मेरीची ऐतिहासिक कामगिरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : भारताची अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोमने आज जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत सहावे सुवर्णपदक पटकाविले. अंतिम फेरीत तिने युक्रेनच्या हाना ओखोटाचा 5-0 असा पराभव केला. 

मेरीने या कामगिरीसह आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडला. तिने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक 2010 मध्ये पटकाविले होते. 

पहिल्या फेरीपासूनच मेरीने सामन्यावर वर्चस्व राखले. तिने आपल्या वेगाच्या जोरावर हानाला प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. मेरीने यापूर्वी 2001 मध्ये रौप्य पदक पटकाविले होते. त्यानंतर तिने 2002, 2005, 2006, 2008, 2010 मध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. 

मेरी कोमची अभूतपूर्व कामगिरी : 

1. सहावेळी विश्वविजेती
2. तीन मुलांची आई
3. बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक पटाकाविणारी एकमेव महिला
4.आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटाकाविणारी एकमेव महिला
5. भारतात बॉक्सिंग खेळ म्हणून रुजविण्यात सिंहाचा वाटा

WebTitle : marathi news mary kom become world champion for the sixth time and creates history 

संबंधित बातम्या

Saam TV Live