अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग; दोघांचा मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबईतल्या अंधेरीतील कामगार रूग्णालयात भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाचे 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रुग्णालयात काहीजण अडकल्याची भीतीही व्यक्त होते आहे.रूग्णांना बाहेर काढण्याचे कामही सुरु आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना बाहेर काढण्यात आलं असून या आगीत एकाचा मृत्यू झालाय. रूग्णालयाच्या वरच्या मजल्यांना ही आग लागली आहे. या परिसरात धुराचे लोट उठल्याचे पाहायला मिळते आहे.

दरम्यान, समोर येणाऱ्या माहितीनुसार या इस्पितळात अद्ययावत अग्निप्रतीबंधात्मक यंत्रणा नव्हती. दुपारी चार वाजताच्या सुमारास आग लागली आहे. चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live