कोरोनावरील औषधासाठी प्रचंड प्रमाणात लूट सुरु

साम टीव्ही
रविवार, 19 जुलै 2020
  • कोरोनाच्या संकटात औषधांच्या काळाबाजाराला ऊत
  • रेमेडिसीवीर औषधांची काळाबाजारात विक्री
  • मुंबईत उघड झाला औषधांचा काळाबाजार

कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक रूग्ण मृत्यूशी झुंज देतायत तर दुसरीकडे रेमडिसीवर सारख्या इंजेक्शनचा काळाबाजार वाढलाय. 5 हजाराच्या एका इंजेक्शनसाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 40 ते 45 हजार रूपये मोजावे लागतायेत. 

कोरोनाच्या संकटात संपूर्ण जग लस शोधण्यासाठी प्रयत्न करतंय. लस मिळेपर्यंत रेमेडिसीवीर वापरत कोरोनाच्या रुग्णांना वाचवलं जातंय. कोरोनाचा उपचार करण्यासाठी रेमेडिसीवीरचा प्रचंड उपयोग होतोय. मात्र हेच सगळं बघून रेमेडिसीवीरचा काळाबाजार करणारेही फोफावलेत.  रेमेडिसीवीरसह इतरही औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला मुंबईतून जेरबंद करण्यात आलंय.

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना फायदेशीर ठरलेल्या रेमेडिसीवीर आणि इतरही औषधांचा काळाबाजार आता उघड झालाय. 5 हजारांमध्ये मिळणाऱ्या रेमेडिसीवीरची विक्री 40 हजारांमध्ये होऊ लागलीय. पोलिसांच्या गुन्हे क्रमांक 7 ने जो पर्दाफाश केलाय, तो या संकटात महत्त्वाचा आहेच... पण संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना आपल्या तुंबड्या भरण्यासाठी औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात. आणि सगळ्या काळाबाजारामागे कोणते मोठे मासे आहेत तेही शोधायला हवं. 


संबंधित बातम्या

Saam TV Live