सरकारनं सोशल मीडियावर लावला कर... धुमसलं लेबनॉन!

फराह खान
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

सध्याच्या घडीला सोशल मीडिया प्रत्येकाच्याच गळ्यातलं ताईत झालंय... अनेक जण
दिवसभरातला बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवतात..
विशेष म्हणजे हे ऍप फ्री ऑफ चार्ज असतात, त्यामुळे इंटरनेटच्या नगण्या चार्जेसशिवाय
इतर खर्च तसा नाहीच..
 मात्र विचार करा तुम्हाला फेसबुक, ट्विटर, व्हाट्सऍपसाठी कर भरावा लागला तर????
विचारही करवत नाही ना... 
मात्र लेबनॉन सरकारनं चक्क या ऍप्सवर कर लावला... आणि मग काय... तिथली जनता
या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरली... आधी घोषणा आणि त्यानंतर

आंदोलनाने हिंसक वळण घेतलं... त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून लेबनॉन धुमसतंय...

17 ऑक्टोबरला लेबनॉनच्या सरकारनं फेसबूक, मॅसेंजर, व्हॉट्सऍप सारख्या सोशल मीडिया
ऍपवर टॅक्सची घोषणा केली... 
देशाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगत, उत्पन्नाच्या हेतूनं हा कर लावण्यात
आला... यानुसार सोशल मीडिया ऍपवरुन कॉल करण्यावर 
विशिष्ट कर लागू करण्यात आला...लेबनॉनच्या सरकारनं ऍप बेस्ड कॉलिंगवर प्रतिदिन 0.20
डॉलर, 
म्हणजेच 14.16 रुपये कर लावला...  सरकारच्या या घोषणेनंतर लोक सैरभैर झाले... आणि
निर्णयाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले...
देशभरात आंदोलनाला सुरवात झाली... हा विरोध दडपण्यासाठी पोलिस सज्ज झाले. मात्र
पोलिस आणि आंदोलकांमध्ये ठिकठिकाणी हिंसक घटना घडल्या.
चौकाचौकात लोकांनी वाहतूक कोंडी केली, जाळपोळ झाली.. केवळ एवढ्यावरच ते थांबले
नाहीत, तर थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली...
अखेरीस जनतेच्या उद्रेकानंतर सरकारनं हा तुघलकी निर्णय मागे घेतला.. मात्र सरकार
नमलं असलं तरी लोकांना राग अद्याप धुमसताच आहे...

लेबनॉन पश्चिम आशियातील प्रजासत्ताक देश आहे.... जगभरातील मंदीचा परिणाम या
देशावरही होतोय. लेबनॉन सरकारनं घेतलेला 
हा सोशल मीडियावरील कराचा निर्णय देशावरील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी होता..
 नागरिकांना मात्र तो पटला नाही... आणि तिथे अराजक माजलं... हे झालं आर्थिक मंदित 
सापडलेल्या लेबनॉनबाबत.. पण जर हा सोशल मीडिया टॅक्स तुमच्या मानगुटीवर बसलं,
तर तुम्ही काय करणार?
 
Web Title : Massive Protest erupt in lebanon over a proposed tax on whatsapp

संबंधित बातम्या

Saam TV Live