CAA विरोधात बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रचंड हिंसाचार

CAA विरोधात बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रचंड हिंसाचार

आज बिहारमध्ये बंदची हाक

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज बिहारमध्ये बंदची हाक देण्यात आलीय. कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय जनता दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. तसंच आंदोलकांकडून महामार्गावर अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले.

शिवाय काही RJD कार्यकर्त्यांनी थेट रेल्वे स्टेशन्सना टार्गेट करत, रेल्वे रोखून धरल्या आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरदेखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. तसंच घरातील जनावरांसह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात सुरू असलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर अफवा रोखण्यासाठी अनेक शहरांतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान 
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची बिहारमध्ये अंमलबजावणी केली जाणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केलं.

उत्तर प्रदेशातील हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू तर 50 पोलीस जखमी

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात जनक्षोभाचा भडका उडालाय... उत्तर प्रदेशातील हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू आणि सुमारे 50 पोलीस जखमी झालेत.. बिजनोरमध्ये दोन, तर संभल, फिरोजाबाद, मेरठ आणि कानपूरमध्ये प्रत्येकी एका निदर्शकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे... उत्तर प्रदेशातील 20 जिल्ह्य़ांमध्ये  आंदोलकांनी हिंसाचार केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

WEB TITLE - Massive violence in Bihar and Uttar Pradesh against CAA

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com