माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप.. संपाचा बाजार समित्यांना फटका..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जानेवारी 2018

राज्यातील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारलाय. याचा परिणाम राज्यातील सर्वच बाजार समित्यांवर झालेला पाहायला मिळतोय. नवी मुंबईतील वाशीमधील बाजार पेठ असेल किंवा मग सांगली, सोलापूर आणि पुण्यातील बाजारपेठ; सर्वच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरलाय. राज्यातील ३६ माथाडी मंडळं बरखास्त करण्याच्या निर्णयविरोधात माथाडी कामगांरांनी बंड पुकारलंय. कायद्याच्या मूळ रचनेत बदल करुन कामगारांचं नुकसान करण्याच्या आरोप केला जातोय. त्यामुळे सरकारच्या मालकधार्जिण्या धोरणाचा निषेध करण्यासाठी माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय.

राज्यातील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारलाय. याचा परिणाम राज्यातील सर्वच बाजार समित्यांवर झालेला पाहायला मिळतोय. नवी मुंबईतील वाशीमधील बाजार पेठ असेल किंवा मग सांगली, सोलापूर आणि पुण्यातील बाजारपेठ; सर्वच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरलाय. राज्यातील ३६ माथाडी मंडळं बरखास्त करण्याच्या निर्णयविरोधात माथाडी कामगांरांनी बंड पुकारलंय. कायद्याच्या मूळ रचनेत बदल करुन कामगारांचं नुकसान करण्याच्या आरोप केला जातोय. त्यामुळे सरकारच्या मालकधार्जिण्या धोरणाचा निषेध करण्यासाठी माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय. माथाडी कायद्यातील अनेक कामगार हितांच्या तरतुदी वगळून माथाडी कायदा निष्प्रभ करण्याचाच घाट घातला जात आहे, असा आरोप माथाडी कामगार संघटनांनी केला आहे.

औरंगाबादमध्ये मोठा प्रतिसाद
माथाडी कामगारांच्या संपाला औरंगाबादमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला..याठिकाणी कामगारांनी भव्य रॅलीही काढली..या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष कामगार सहभागी झाले होते. माथाडी मंडळ मोडून काढण्य़ाचा सरकारचा घाट आहे असा आरोप या कामगारांनी केलाय..त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ माथाडी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. 

संपाचा परिणाम नाशिक जिल्ह्यातही
माथाडी कामगारांनी राज्यभर पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणीक संपाचा परिणाम नाशिक जिल्ह्यातही जाणवला. नाशिक मधील जवळपास सहा हजार माथाडी कामगार या संपात सहभागी झालेत. अर्थातच याचा परिणाम जिल्ह्यातील बाजारसमित्यांवर जाणवतोय. 

marathi news mathadi agitation in maharashtra 


संबंधित बातम्या

Saam TV Live