माथेरानच्या मिनी ट्रेनकडे पर्यटकांची पाठ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

माथेरानच्या मिनी ट्रेनकडे पर्यटकांची अक्षरशः पाठ फिरवलीये. माथेरान-अमन लॉज या शटल सेवेच्या चार फेऱ्या रद्द करून मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान ही एकच फेरी सुरू करण्याचा रेल्वेचा बेत सपशेल फसला आहे. गाडीचा खर्च सोडाच, पण मोटरमन-गार्ड इत्यादी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्चसुद्धा निघणार नाही अशी या सेवेची अवस्था झाली आहे. नेरळ - पर्यटकांचा मोठा प्रतिसाद माथेरान-अमन लॉज या शटल सेवेला मिळत होता. पण या शटल सेवेच्या 4 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी नेरळ-माथेरान ही एकच फेरी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

माथेरानच्या मिनी ट्रेनकडे पर्यटकांची अक्षरशः पाठ फिरवलीये. माथेरान-अमन लॉज या शटल सेवेच्या चार फेऱ्या रद्द करून मिनी ट्रेनची नेरळ-माथेरान ही एकच फेरी सुरू करण्याचा रेल्वेचा बेत सपशेल फसला आहे. गाडीचा खर्च सोडाच, पण मोटरमन-गार्ड इत्यादी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्चसुद्धा निघणार नाही अशी या सेवेची अवस्था झाली आहे. नेरळ - पर्यटकांचा मोठा प्रतिसाद माथेरान-अमन लॉज या शटल सेवेला मिळत होता. पण या शटल सेवेच्या 4 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि त्या ठिकाणी नेरळ-माथेरान ही एकच फेरी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नफ्यात चाललेल्या शटल सेवेला कमी वेळ मिळत असल्याने प्रवाशांच्या संख्येवर विपरित परिणाम झाला आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live