महाराष्ट्रातच अनुभवा स्वित्झर्लॅण्डचा निसर्ग

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

स्वित्झर्लण्डच्या निसर्ग सौदर्यानं अनेकांना भुरळ घातलीय. बॉलिवूडच्या गाण्यांमधून दिसणारा स्वित्झर्लण्डचा नजारा याचीदेही याची डोळा अनुभवावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र आता निसर्गाची अद्धूत किमया अनुभवण्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लण्डला जाण्याची आवश्यकता नाही.. तर अगदी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच फुलांची ही जादूई दुनिया तुमचं स्वागत करते.

हिरवेगार डोंगर आणि केशरी माळरान हे चित्र आहे मावळ परिसरातील..नवरात्रौत्सवाच्या काळात मावळच्या संपूर्ण परिसरात मफलरच्या केशरी फुलांची उधळन झालेली पाहायला मिळते. देहूरोड ते लोणावळा या भागातच प्रमुख्याने ही फुल बघायला मिळतात.

रेल्वे शेजारी तसचं पुणे-मुंबई हायवे नजीकही सर्दूर मफलरची केशरी फूलं फुललेली दिसतात.  इथून जाणाऱ्या अनेकांना हे दृश्य़ भूरळ घालतं.. गार वारा.. डोंगर कडे आणि वाऱ्यावर डुलणारी फुलं. या अल्हाददायक वातावरणात गाडी थांबवून फोटा काढण्याचा मोह कुणाला होणार नाही.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live