1 मे ला वर्षातलं पहिलं चक्रीवादळ उठणार, आजपासून राज्याच्या काही भागात पाऊस होण्याचा अंदाज

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 एप्रिल 2020

आजपासून राज्याच्या बऱ्याच भागात पाऊस सुरु होण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं व्यक्त केलाय..

आजपासून राज्याच्या बऱ्याच भागात पाऊस सुरु होण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं व्यक्त केलाय..
१ मे ला वर्षातलं पहिलं चक्रीवादळ उठणार असल्याचा अंदाज आहे. सध्या हे वादळ तयार झालं असून ते बंगालची खाडी आणि अंदमानच्या समुद्रात आहे..या वादळामुळं महाराष्ट्रात आजपासून पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे...विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे..बंगालच्या खाडीत हे चक्रीवादळ उठणार आहे.

उत्तर आणि दक्षिण भारतात कमाल तापमान वाढीच्या वेगाचा आलेख उंचावत असतानाच आता २०२० या वर्षातील पहिले चक्रीवादळ १ मे रोजी उठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालची खाडी, अंदमानचा समुद्र येथे या चक्रीवादळहोण्याचे संकेत मिळाले असून, यानुसार चक्रीवादळाचा पुढील प्रवास म्यानमार आणि बांग्लादेशाच्या दिशेने होईल, अशी माहिती स्कायमेटने दिली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात २७ आणि २८ एप्रिल रोजी ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर राहील; महत्त्वाचे म्हणजे पारा वाढत असतानाच विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live