बीएमसीच्या शाळेतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू आजारामुळे; मुंबईच्या महापौरांचा अजब दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुंबईच्या गोवंडीतील शिवाजी नगर परीसरातील एका महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना औषधातून विषबाधा झालीय.

रोड क्रमांक आठवरच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय... यामध्ये एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर, इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय...रोगप्रतिबंधक औषधाचा डोस पाजल्यावर विद्यार्थी अस्वस्थ झाल्याचं समजतंय.

दरम्यान महापौर विश्वनाथ   महाडेश्वर यांनी विद्यार्थिनीचा विषबाधेमुळं नाही तर कोणत्या तरी आजारानं मृत्यू झाला असावा असा जावाई शोध लावलाय. 

दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केलीय. पालिकेच्या भ्रष्टाचारानं विद्यार्थिंनीचा जीव घेतला...तिच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live