गुगल इंडियाचे एमडी राजन आनंदन यांचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 एप्रिल 2019

नवी दिल्ली: गुगलचे दक्षिण आशियातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन गुगलमधून बाहेर पडले आहेत. आनंदन दक्षिण आशियातील वित्तीय कंपनी सिक्वाया कॅपिटलमध्ये रुजू होणार आहेत. एप्रिलअखेर आनंदन गुगलमधून बाहेर पडतील. त्यानंतर ते सिक्वाया कॅपिटलच्या भारतासाठीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार सांभाळतील. 

आनंदन गुगलमध्ये आठ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत होते. नवी नियुक्ती होईपर्यत गुगलचे विक्री विभागाचे संचालक आनंदन यांच्याजागी हंगामी स्वरुपात कार्यभार स्वीकारणार आहेत. राजन आनंदन यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होतो आहे, असे मत सिक्वाया कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंग यांनी व्यक्त केले आहे. आनंदन सिक्वाया कॅपिटलच्या भारतातील विस्तारावर लक्ष केंद्रित करणार आहेत. ते कंपनीसाठी गुंतवणूक सल्लागार आणि मार्गदर्शकाचे काम करणार आहेत. आनंदन यांनी आपल्या करियरची सुरूवात मॅकिन्सि या कंपनीतून केली होती. त्याचबरोबर ते डेल इंडियाचे उपाध्यक्ष आणि भारतातील मुख्यव्यवस्थापकसुद्धा होते. गुगलमध्ये रुजू होण्याआधी आनंदन मायक्रोसॉफ्टचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live