"मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही" - फराह खान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर पहिल्यांदाच  साजिदची बहिण फराह खान हिनं प्रतिक्रिया दिली आहे. मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नसल्याचं सांगत, मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं फराह खाननंने म्हटलं आहे.

महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर फराह खाननं ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. 

मी टू अंतर्गत आता अभिनेता-दिग्दर्शक साजिद खानचंही नाव पुढे आलं आहे. दिग्दर्शक साजिद खान याच्यावर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यात एक्स-असिस्टंट सलोनी चोप्रा, अभिनेत्री रिचेल वॉईट आणि जर्नलिस्ट करिश्मा या तिघींचा समावेश आहे.

साजिद अश्लिल फोटो मागायला, लगट करायचा असं सलोनी चोप्राने म्हटलंय. दरम्यान लैंगिग छळाच्या आरोपांनंतर साजिद खानने 'हाऊसफुल ४' या सिनेमाचं दिग्दर्शन सोडलं आहे. अभिनेता अक्षय कुमारनं देखील हाऊसफुल ४चं शूटिंग रद्द करण्याची विनंती निर्मात्यांना केली होती.

WebTitle : marathi news  me too choreographer fraha khan on sajid khan sexual abuse  controversy 

संबंधित बातम्या

Saam TV Live