लतादीदींच्या प्रकृतीबद्दल कुटुंबीयांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

लतादीदींच्या प्रकृतीबद्दल कुटुंबीयांनी दिली 'ही'  महत्वाची माहिती

जेष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल मोठी आणि दिलासादायक बातमी आज (बुधवार) समोर येतेय. मंगेशकर  कुटुंबीयांकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. लता दीदींची प्रकृती स्थिर आहे असं मंगेशकर कुटुंबीयांकडून सांगण्यात येतंय.

STATEMENT FROM LATAMANGESHKARJI's FAMILY
 

Lata di is stable and much better. Thank you very much for your prayers.  We are awaiting her to be at her best so she can  be home soon. Thank You for being with us and respecting our privacy.

Warm regards 
 

लता दीदी यांची तब्येत आता स्थिर आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आम्ही लता दीदी याची प्रकृती ठणठणीत व्हायची वाट पाहत आहोत आणि लवकरात लवकर लता दीदी यांना घरी सोडण्यात येईल याचीही आम्ही वाट पाहतोय. आमच्या सोबत राहिल्याबद्दल आणि आमच्या खासगी जीवनाचा आदर ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार.  

दरम्यान, हॉस्पिटल मधील सूत्रांच्या माहितीनुसार 90 वर्षीय लतादीदी यांना अद्यापही लाइफ सपोर्ट सिस्टीम म्हणजेच व्हेंटीलेटर ठेवण्यात आलं आहे. लता दीदी यांना हृदयातील जंतूसंसर्ग झालाय. असतातच लता दीदी यांना न्युमोनिया देखील झाला असल्याची माहिती आता समोर येतेय. म्हणूनच लता दीदींना ICU मधून अद्याप बाहेर काढण्यात येन नाहीये.   

जेष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता दीदी यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभाग म्हणजेच ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे. 

लता मंगेशकर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तब्बल 36 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तीस हजाराहून जास्त गाणी लता दीदी यांनी गायली आहेत. लता दीदींना भारतातील सर्वोच्च पुरस्कार 'भारत रत्न' याने सन्मानित करण्यत आलं आहे. 

Webtitle : medical mangeshkar health update news shared by mangeshkar family

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com