वेतनवाढीसंदर्भात ST कामगार संघटना आणि अधिकाऱ्यांत झालेली चर्चा फिस्कटली

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

वेतनवाढीसंदर्भात ST महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात कामगार संघटना आणि अधिकाऱ्यांत झालेली चर्चा फिस्कटली. वेतनवाढीवर संघटना आपल्या मागण्यावर ठाम राहिली आणि एसटी महामंडळाने ठेवलेला प्रस्ताव नाकारला. त्यामुळे चर्चेची पहिली फेरी विस्कटल्यानंतर येत्या दहा दिवसांत वेतनवाढीवर चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह अन्य पाच संघटनांनी केली आहे. त्यासाठी पुढील चार वर्षांचा वेतन करारही करण्यात आलेला नाही. महामंडळाकडून वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आली आहे.

वेतनवाढीसंदर्भात ST महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात कामगार संघटना आणि अधिकाऱ्यांत झालेली चर्चा फिस्कटली. वेतनवाढीवर संघटना आपल्या मागण्यावर ठाम राहिली आणि एसटी महामंडळाने ठेवलेला प्रस्ताव नाकारला. त्यामुळे चर्चेची पहिली फेरी विस्कटल्यानंतर येत्या दहा दिवसांत वेतनवाढीवर चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह अन्य पाच संघटनांनी केली आहे. त्यासाठी पुढील चार वर्षांचा वेतन करारही करण्यात आलेला नाही. महामंडळाकडून वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीही नेमण्यात आली आहे. मात्र या समितीचा अहवाल एसटी संघटनांकडून अमान्य करण्यात आला आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live