मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

उद्या मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.. मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली असून ब्लॉक काळात हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही.

 प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यानच्या दोन्ही मार्गांवर ब्लॉक असणार आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live