आजपासून ईगतपुरीजवळ पुन्हा ४ दिवसांचा मेगाब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथे सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी आजपासून ईगतपुरीजवळ पुन्हा ४ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणारे. आजपासून 26 ऑक्टोबरपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवरील इगतपुरी येथे सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी आजपासून ईगतपुरीजवळ पुन्हा ४ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणारे. आजपासून 26 ऑक्टोबरपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकदरम्यानच्या काळात भुसावळ-मुंबई पॅसेंजर 4 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. तसंच लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेत. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
 
ब्लॉक झाल्यानंतरडाउन दिशेला धावणाऱ्या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४५ ते ५० मिनिटे उशिराने धावतील त्याचबरोबर अप दिशेला धावणाऱ्या गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

WebTitle : marathi news megablock on igatpuri railway station for important engineering work   

संबंधित बातम्या

Saam TV Live