मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई : छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला मराठी "बिग बॉस' या रिऍलिटी शोच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे ठरली. बिग बॉसच्या ट्रॉफीसह तीला 18 लाख 60 हजार एवढ्या रकमेचा धनादेश मिळाला आणि निर्वाळा रियालिटी सिटी ऑफ म्युझिकडून घर असे घसघशीत बक्षीस तिला मिळाले. जिंकल्यानंतर तीच्यावर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. 

मराठी "बिग बॉस'चं विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. रविवारी रंगलेल्या "बिग बॉस'च्या या महाअंतिम सोहळ्यात विजेत्याचे नाव अखेरीस घोषित करण्यात आले आहे. "बिग बॉस'च्या या पहिल्या सीझनमध्ये 18 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील सहा स्पर्धकांमध्ये मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग आणि सई लोकुर अंतिम फेरीत दाखल झाले होते. "बिग बॉस'च्या घरातील या सहा सदस्यांमध्ये गेल्या आठवड्यापासूनच जिंकण्यासाठी बरीच चढाओढ दिसत होती. मराठी "बिग बॉस'च्या पहिल्या सीझनच्या विजेत्याचा मान नक्की कोणाला मिळणार? यावरुन अनेक तर्क वितर्कही लढवले गेले. पण महाअंतिम सोहळ्यात सुरुवातील शर्मिष्ठा पाठोपाठ आस्तादही घराबाहेर पडला. सई-पुष्करच्या धमाकेदार परफॉर्मन्सने तर "बिग बॉस'च्या महाअंतिम सोहळ्याला चार चॉंद लावले. 

तसेच रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यातील वाढती मैत्री "बिग बॉस' मराठीचं मुख्य आकर्षण ठरली. त्यानंतर घरातील बदलती गणितं पाहता मेघा, सई आणि पुष्कर या मैत्रीच्या त्रिकुटालाही तडा गेला. पण वाइल्ड कार्ड एण्ट्रीनं घरात दाखल झालेल्या शर्मिष्ठानं फिनाले पर्यंत मजल मारली आणि हे या सीझनमध्ये कौतुकास्पद ठरलं. 

WebTitle : marathi news megha dhade big boss marathi season one winner 

संबंधित बातम्या

Saam TV Live