CAB | ...तर उत्तर कोरियात चालते व्हा; कोणी दिला आंदोलकांना सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 डिसेंबर 2019

शिलाँग : मोदी सरकारच्या निर्णयांविरोधात आवाज उठविणाऱया नागरीकांना 'पाकिस्तानात चालते व्हा,' असा इशारेवजा सल्ला भाजप समर्थकांनी दिल्याचा नजिकचा इतिहास आहे. मेघालयचे राज्यपाल आणि पश्चिम बंगाल भाजपचे पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष तथागत रॉय यांनी आता त्यापुढचे पाऊल टाकले आहे. नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाला (Citizenship Amendment Bill 2019) विरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांना त्यांनी 'उत्तर कोरियात चालते व्हा,' असा सल्ला दिला आहे. 

UNCUT | ... अगर देश प्यारा है तो आवाज उठाएं - प्रियंका गांधी
 
लोकशाहीमध्ये विरोधी मतप्रवाह असणारच. ज्यांना ते मान्य नाही, त्यांनी उत्तर कोरियात चालते व्हावे, असे ट्विट त्यांनी शुक्रवारी केले. 

'सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी कधीही विसरता कामा नयेत. 1. धर्माच्या नावावर भारताची एकदा फाळणी झाली आहे. 2. लोकशाहीमध्ये विरोधी मतप्रवाह असणारच. ते तुम्हाला नको असतील, तर तुम्ही उत्तर कोरियात चालते व्हा,' असे ट्विट त्यांनी केले. 

नागरीकत्व दुरुस्ती विधेयक नुकतेच लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झाले आहे. त्यानंतर ईशान्य भारतात हिंसाचार उसळला आहे. ईशान्येमध्ये या कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी राजभवनासमोर आंदोलन सुरू होते. त्याचवेळी तथागत रॉय यांनी असे ट्विट केले. 

UNCUT | सोनिया गांधीचा मोदींवर हल्लाबोल...

उत्तर कोरिया किम जोंग उन या हुकुमशहाच्या अंमलाखालील राष्ट्र आहे. ईशान्य भारतीयांची शारीरिक ठेवण प्रामुख्याने चीनी, जपानी आणि कोरियन वळणाची आहे. शास्त्रीय परीभाषेत या शारीरिक ठेवणीला मंगोलाईड म्हणतात. भारताच्या अन्य भागांमध्ये ईशान्य भारतीयांना या टोमण्यांचा सामना करावा लागतो. मात्र, खुद्द राज्यपालांनी अशा तऱहेचे वक्तव्य केल्याचे पडसाद उमटत आहेत. 

Web Title: Meghayala governor tathagata roy suggests Go to North Korea to the protesters of CAB

संबंधित बातम्या

Saam TV Live