हीच बायको पुन्हा मिळू नये म्हणून पुरुषांची पिंपळपौर्णिमा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. पण औरंगाबादमध्ये काही पुरूषांनी हीच बायको पुन्हा मिळू नये म्हणून त्यांनी चक्क पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारल्या.

हे सर्व पुरूष पत्नी पीडित संघटनेचे कार्यकर्ते आहेत. बायकोच्या जाचाला कंटाळून औरंगाबादच्या पुरुषांनी हे हटके आंदोलन केलं. बायकोपासून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व पुरुषांनी पिंपळाच्या झाडाजवळ यमाला विनंती करत पूजा केली.

हे सर्व पुरुष पत्नीनं दाखल केलेल्या केसेसमुळे वैतागलेले आहेत. पिंपळाच्या झाडाखाली मुंजा असतो म्हणून त्यांनी वडाच्या झाडाऐवजी पिंपळाची पूजा केली असं त्यांचं म्हणणं आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live