पुरुषाच्या शरीरात बायप्सी चाचणीमध्ये आढळलं सहा बाय अडीच बाय दोन आकाराचं गर्भाशय

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई  
सोमवार, 8 जुलै 2019

इश्श्य सिनेमातला अंकुश चौधरी आठवतो का तुम्हाला. या सिनेमात अंकुश चौधरीला एक गोंडस बाळ होतं, हा अख्खा सिनेमा एक स्वप्न असतं असं नंतर कळतं, पण संपुर्ण सिनेमाभर पुरुषाला बाळ कसं होऊ शकतं असा एक प्रश्न सतत पाठलाग करत असतो. अगदी तंतोतंत नाही पण मुंबईत असंच काहीसं घडलंय एका व्यक्तीच्या बाबतीत. मुल का होत नाही म्हणून जेजे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेला असता या व्यक्तीचे अंडाशय पोटातच असल्याचं आढळलं. अंडाशयासह महिलांमध्ये आढळणारे गर्भाशयासारखे अवयवही दिसले. बायप्सी चाचणीमध्ये सहा बाय अडीच बाय दोन आकाराचे गर्भाशय आणि त्याच्याशी निगडित इतर अवयवही डॉक्टरांना आढळले.

इश्श्य सिनेमातला अंकुश चौधरी आठवतो का तुम्हाला. या सिनेमात अंकुश चौधरीला एक गोंडस बाळ होतं, हा अख्खा सिनेमा एक स्वप्न असतं असं नंतर कळतं, पण संपुर्ण सिनेमाभर पुरुषाला बाळ कसं होऊ शकतं असा एक प्रश्न सतत पाठलाग करत असतो. अगदी तंतोतंत नाही पण मुंबईत असंच काहीसं घडलंय एका व्यक्तीच्या बाबतीत. मुल का होत नाही म्हणून जेजे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेला असता या व्यक्तीचे अंडाशय पोटातच असल्याचं आढळलं. अंडाशयासह महिलांमध्ये आढळणारे गर्भाशयासारखे अवयवही दिसले. बायप्सी चाचणीमध्ये सहा बाय अडीच बाय दोन आकाराचे गर्भाशय आणि त्याच्याशी निगडित इतर अवयवही डॉक्टरांना आढळले. अशा रुग्णांना पुढे अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते.  त्यामुळं शस्त्रक्रिया करुन हे गर्भाशय काढणं गरजेचं होतं. जे.जे हॉस्पिटलचे युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्यकंट गिते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही शस्त्रक्रिया केली.

एखाद्या पुरुषाच्या शरीरात गर्भाशय आढळणं ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे. आजवर जगात केवळ 200 पुरुषांच्या पोटात गर्भाशय आढळून आलंय. असं असलं तरीही ही कोणतीही विकृती नसून याला वैद्यकीय भाषेत 'फिमेल प्रायमरी म्युलिरियन ड्क्ट सिंड्रोम म्हणतात. शरीरातील अँटीम्युलिरियन हार्मोन्सच्या कमतरतेमुळं गर्भाशयाची निर्मिती होऊ शकते. 

आपल्या पोटात गर्भाशय असल्याचा धक्का पचवणं कोणत्याही पुरुषाला अवघड असतं, तसंच तो भविष्यात पिता होऊ शकणार नसल्यानं त्याच्यावर मानसिक आघात न होता शस्त्रक्रिया करणे गरजेचं होतं. सुमारे 15 दिवस त्याचं आणि त्याच्या कुटूंबाचे समुपदेशन केल्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करुन गर्भाशय काढण्यात आल्यानं डॉ.गिते आणि त्यांच्या टीमचं कौतुक केलं जातंय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live