नाशिकमधील अनेक महाविद्यालयांकडून अक्षम्य चूक, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर 'कोरोना बॅच'चा डाग

साम टीव्ही
रविवार, 12 जुलै 2020
  • नाशिकमधील अनेक महाविलयांकडून अक्षम्य चूक
  • विद्यार्थ्यांच्या मार्कशिटवर 'कोरोना बॅच' असा उल्लेख
  • विद्यार्थ्यांच्या भविष्यावर 'कोरोना बॅच'चा डाग

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांना पास केलं गेलंय. पण काही कॉलेजेसनी अकरावीच्या मार्कशिटवर असा काही शिक्का मारलाय की, विद्यार्थ्यांना आयुष्यभर तो शिक्का वागवत राहावा लागणारेय.

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, त्यातच आता नाशिकच्या अनेक महाविद्यालयांनी अक्षम्य चूक केलीय. या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या मार्कशिटवर चक्क कोरोना बॅच असा शिक्का मारलाय. 

शिक्षणमंत्र्यांनी अकरावीच्या परीक्षा रद्द करत, विद्यार्थ्यांना पास करण्याचे आदेश दिलेत. तरीही या कॉलेजांनी आगळीक करत विद्यार्थ्यांना कोरोना बॅचचा शिक्का मारलाय. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.

नाशिकमधल्या कॉलेजांनी केलेल्या या आगळीवर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यायत. विद्यार्थ्यांच्या मार्कशिटवरचा कोरोना बॅचचा शिक्का पुसून टाकावा आणि संबंधित कॉलेजांवर कारवाईची मागणी त्यांनी केलीय.

कोरोनाच्या संकटात अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं घोंगडं भिजत पडलंय. असं असताना, संकटांना घाबरू नये अशी शिकवण ज्यांनी द्यायची, त्यांनीच विद्यार्थ्यांना कोरोना बॅच म्हणून हिणवणं कितपत योग्य आहे?


संबंधित बातम्या

Saam TV Live