लोकसभा प्रचाराला सुरुवात झाली, मोदींची महाआघाडीच्या नेत्यांवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

मेरठ: काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ले सुरु होते; त्यावर पूर्णपणे अंकुश आणण्याचे काम आताच्या सरकारने केले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. आपण जमीन आकाश आणि अवकाशात सर्जिकल स्ट्राईक केला असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये ते बोलत होते. देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना 75 कोटी रुपयांची मदत दिली असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

मोदी म्हणाले की, पूर्वी दहशतवाद्यांकडे धर्माच्या आधारे बघितले जायचे, देशात यूपीएचे सरकार असताना बॉम्बस्फोट व्हायचे. आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मोदींनी शुभारंभ केला असून महाआघाडीच्या नेत्यांवर त्यांनी आज जोरदार टीका केली.

चौकीदार कधीच अन्याय करत नाही; लोकांनी संधी दिल्यामुळेच कामे पूर्ण करता आली असल्याचे मोदींनी म्हटले. देशाला भारताचे हिरो पाहिजेत की पाकिस्तानचे असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तसेच चौकीदाराला पुरावे मागणारे सध्या अश्रू ढाळत आहेत. पण एक लक्षात ठेवा, चौकीदार हा कधीही अन्याय करत नाही. सेट आणि एसॅट यामधील फरक ज्यांना कळत नाही त्यांची कीव येत असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

Web Title: Narendra Modi begins Lok Sabha election campaign today From UP

संबंधित बातम्या

Saam TV Live