VIDEO | गांधीजींच्या मारेकऱ्याचं नाव मेरठला?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 18 डिसेंबर 2019

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचं नाव मेरठ जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न यूपी सरकार करतंय, अशी चर्चा आहे. मात्र, असा काहीही प्रस्ताव नसल्याची सारवासारव उत्तर प्रदेश सरकारनं केलीय.

महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचं नाव मेरठ जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न यूपी सरकार करतंय, अशी चर्चा आहे. मात्र, असा काहीही प्रस्ताव नसल्याची सारवासारव उत्तर प्रदेश सरकारनं केलीय.

सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या उत्तर प्रदेश सरकारनं राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचं नाव मेरठ या जिल्ह्याला देण्याचा घाट घातल्याची माहिती आहे. मेरठचं नाव पंडित गोडसे नगर करण्यासाठी योगी सरकार जोरदार प्रयत्न करत असल्याचं कळतंय.
केवळ मेरठच नाही तर उत्तर प्रदेशातल्या अन्य महत्त्वाच्या जिल्ह्यांचंही नामांतर करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
मेरठचं नामांतर पंडित गोडसेनगर, हापुडचं नामांतर महंत अवैद्यनाथ नगर तर गाजियाबादचं नामांतर महंत दिग्विजय नगर करण्याचा घाट घातला जातोय.

याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या महसूल विभागानं तिन्ही  जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं त्यांचं मत सादर करण्याचे आदेश दिलेत..गेल्या 4 महिन्यांत तीन वेळा जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी विचारणा केल्यानं या नामांतराबाबत सरकार किती घाई करतंय, हे दिसून येतंय.

एका भेकडाप्रमाणे गांधीजींवर गोळ्या चालवून फासावर गेलेल्या नथुरामचं उदात्तीकरण करण्याचं धोरण जर यूपी सरकार राबवत असेल तर त्यातून चुकीचाच संदेश केवळ भारत नाही तर जगात जाईल, हे नक्की.

Web Title - merath named as natthuram godase. 


संबंधित बातम्या

Saam TV Live