एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर; अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल राज्यात प्रथम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 जून 2019

अमरावती : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेत यशस्वी कामगिरी करीत अमरावतीच्या सिद्धेश अग्रवाल 99.99 टक्के गुणांसह टॉपर ठरला आहे.

मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे.-राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर २०, ९३० विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

Web Title: MH CET Results declare and Siddhesh Agrawal ranked first

संबंधित बातम्या

Saam TV Live