म्हाडावर लॉटरीची सोडत पुढे ढकलण्याची नामुष्की 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

म्हाडाच्या कोकण विभागाच्या ऑनलाइन नोंदणीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादाचा फटका म्हाडाच्या लॉटरीला बसला आहे. त्यामुळे ही लॉटरी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही ऑनलाइन नोंदणी 18 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर, 18 ऑगस्टला होणारी लॉटरीची सोडत देखील नवीन वेळापत्रकानुसार 25 ऑगस्टला होईल.

म्हाडाची ही लॉटरी तब्बल 9 हजार 18 घरांसाठी आहे. म्हाडाने कोकण विभागीय लॉटरीत जाहीर केलेल्या घरांच्या किमती खासगी विकासकांच्या घरांच्या किमतीपेक्षा अधिक असल्यामुळे ग्राहकांनी म्हाडाकडे पाठ फिरविली असल्याचं बोललं जातंय

WebTitle : marathi news MHADA lottery affordable housing 

संबंधित बातम्या

Saam TV Live