म्हाडाची आणखी ३,५०० घरांची सोडत

म्हाडाची आणखी ३,५०० घरांची सोडत

पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच साधारण सप्टेंबर महिन्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने आणखी साडेतीन हजार नवीन सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता. ७) केली.

म्हाडाच्या पुणे मंडळातील पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील ४ हजार ७५६ सदनिकांसाठी आज अल्पबचत भवन येथे ऑनलाइन सोडत काढण्यात आली. या सदनिकांसाठी ४१ हजार ५०१ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीला प्रारंभ करण्यात आला. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुख्याधिकारी अशोक पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘‘म्हाडाच्या ऑनलाइन सोडतीला मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ऑनलाइन सोडतीमध्ये मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पारदर्शक कारभारामुळे ऑनलाइन सोडतीवरील नागरिकांचा विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळे म्हाडाची ऑनलाइन सोडतीची प्रक्रिया आता सिडकोही स्वीकारणार आहे. सदनिकेची लॉटरी लागल्यानंतर काहींना कर्जासाठी बॅंकेत चकरा माराव्या लागतात. कागदपत्रांची पूर्तता करताना दमछाक होते. त्यामुळे म्हाडाकडून संबंधितांना बॅंकांच्या सहकार्याने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.’’

Web Title: MHADA 3500 Lottery

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com