म्हाडाला मिळणार संक्रमण शिबिरातील 1500 घरं

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मे 2019

मुंबई - बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील प्रकल्पांतून म्हाडाला संक्रमण शिबिरातील १५०० घरे मिळणार आहेत. घरे जूनमध्ये म्हाडाच्या ताब्यात येतील, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे देण्यात आली.

मुंबई - बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील प्रकल्पांतून म्हाडाला संक्रमण शिबिरातील १५०० घरे मिळणार आहेत. घरे जूनमध्ये म्हाडाच्या ताब्यात येतील, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे देण्यात आली.

मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत आवश्‍यक असणाऱ्या राखीव घरांचा कोटा शिल्लक नाही. त्यामुळे संक्रमण शिबिरातील घरे वाढवण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू होते. या संदर्भात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील प्रकल्पांचा आढावा घेतला. कामे अर्धवट सोडलेल्या विकासकांच्या जागा ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाचे आदेश मिळाल्यामुळे बॉम्बे डाईंगमधील १६३२ आणि श्रीनिवास मिलमधील १८७५ घरे म्हाडाच्या ताब्यात येणार आहेत. सध्या संक्रमण शिबिरात सुमारे २२ हजार नागरिक राहत आहेत. संक्रमण शिबिरांमधील ४०० घरे राखीव असावीत, असा नियम आहे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांना तत्काळ निवारा देण्यासाठी त्या घरांचा वापर करण्याची तरतूद कायद्यात आहे. परंतु, मुंबईतील वेगवेगळ्या प्रकल्पांमधील नागरिकांना त्या घरांचे वाटप केल्यामुळे फक्त १३० घरे शिल्लक होती. तूट भरून काढण्यासाठी जूनमध्ये मिळणाऱ्या संक्रमण शिबिरातील घरांचा वापर  केला जाईल. 

एकही सदनिका शिल्लक नाही
माहीम ते कुलाब्यापर्यंत संक्रमण शिबिरांत एकही सदनिका शिल्लक नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास अडचण निर्माण झाली असती. त्यातच संक्रमण शिबिरातील घरांपैकी १२०० घरे बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे २०० सदनिका इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला देण्याचा निर्णय झाला आहे.

Web Title: marathi news mhada to get 1500 houses from bombay dyeing and srinivas mills projects


संबंधित बातम्या

Saam TV Live