माहिम-वांद्रे दरम्यान दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

मुंबई: पश्‍चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 10 व 11 जानेवारीच्या आणि 11 व 12 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान चर्चगेटहून शेवटची लोकल मध्यरात्री 12.50 वाजता सुटेल. 

शुक्रवारी (ता. 10) आणि शनिवारी (ता. 11) मध्यरात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत पश्‍चिम रेल्वेच्या धीम्या व जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत. अहमदाबाद पॅसेंजर 20 ते 25 मिनिटे आणि गोल्डन टेम्पल मेल 15 मिनिटे उशिराने धावणार आहे. वडोदरा एक्‍स्प्रेस 10 मिनिटे उशिराने धावेल आणि दादर स्थानकातच समाप्त केली जाईल. त्यामुळे प्रवाशांनी माहिती घेऊन प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाने केलंय. 

रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारचा (ता. 12) ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. 

या धीम्या लोकल रद्द 
चर्चगेट ते वांद्रे : रात्री 11.06 
चर्चगेट ते अंधेरी : मध्यरात्री 12.31 
चर्चगेट ते बोरिवली : मध्यरात्री 1.00 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 4.57 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.20 
महालक्ष्मी ते बोरिवली : पहाटे 5.06 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 5.35 
वांद्रे ते बोरिवली : पहाटे 6.11 
दादर ते विरार : पहाटे 5.20 
चर्चगेट ते गोरेगाव : पहाटे 5.15 
अंधेरी ते चर्चगेट : पहाटे 4.04 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 3.50 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.08 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.23 
बोरिवली ते चर्चगेट : पहाटे 4.27 
विरार ते दादर : पहाटे 4.13 
बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.07 
बोरिवली ते चर्चगेट : सकाळी 6.20 

या जलद लोकल होणार धीम्या 
भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.05 
विरार ते चर्चगेट : पहाटे 3.53 
भाईंदर ते चर्चगेट : पहाटे 4.36 
विरार ते चर्चगेट : पहाटे 4.25 

Web Title: Midnight block between Mahim and Bandra

संबंधित बातम्या

Saam TV Live