भारताच्या सामरिक सामर्थ्याला राफेलचं कवच, वाचा राफेलचं काम कसं आहे?

साम टीव्ही
बुधवार, 29 जुलै 2020
  • महाशक्तिशाली राफेल आता भारताच्या ताफ्यात
  • शत्रूच्या उरात धडकी भरवणार राफेल
  • भारताच्या सामरिक सामर्थ्याला राफेलचं कवच

उंच आकाशातून रुबाबात भारतात येणारी ही राफेलची विमानं बघून प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानानं भरून आलाय. आणि तिकडे शत्रूच्या उरात धडकी भरलीय. फ्रान्समधून निघालेली 5 राफेल विमानं 7 हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतात डेरेदाखल झालीयत. शौर्याचा इतिहास गाठीशी असणाऱ्या भारतीय वायुदलाच्या भात्यात आता राफेलचं महाशक्तिशाली अस्त्र आलंय.

शत्रूच्या उरात धडकी भरवणार राफेल

राफेल लढाऊ विमान कोणत्याही मोहिमेवर झुंजारपणे लढतं. त्याचसोबत, राफेल विमानं हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अचूक माराही करतात. राफेल विमानाची इंधन क्षमता १६ हजार किलो इतकी आहे. त्याचप्रमाणे, मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट अशी राफेलची ओळख आहे. राफेलची मारक क्षमता ३ हजार ६०० किलोमीटर इतकी आहे. राफेल विमानाचा ताशी वेग २२२३ किमी इतका आहे.

शौर्याचा इतिहास असणाऱ्या भारताच्या भूमीवर राफेल विमानांनी लॅण्डिंग केलं आणि प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आलाय. त्याचसोबत भारताशी कायम पंगा घेणाऱ्या चीन आणि पाकिस्तानच्या उरात धडकी भरलीय. आता कुणी जर आता भारताविरोधात दंड थोपटले तर भारत शत्रूला चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live