मिलिंद एकबोटेची शिक्रापूर पोलिसांकडून चौकशी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

कोरेगाव भीमा दंगल भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे आज शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. अर्थात त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला असल्यानं त्यांना अटक न करता चौकशी करून सोडण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कोरेगाव-भीमा प्रकरणासंदर्भात मिलिंद एकबोटेंची चौकशी केली. याआधी मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही असा सवाल कोर्टानं उपस्थित केला होता. त्यानंतर आज मिलिंद एकबोटे पोलिस स्टेशनमध्ये हजर झालेत. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या दंगलीला मिलिंद एकबोटे कारणीभूत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर संघटनांनी केलाय. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना अटक होणार का?

कोरेगाव भीमा दंगल भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे आज शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. अर्थात त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला असल्यानं त्यांना अटक न करता चौकशी करून सोडण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कोरेगाव-भीमा प्रकरणासंदर्भात मिलिंद एकबोटेंची चौकशी केली. याआधी मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही असा सवाल कोर्टानं उपस्थित केला होता. त्यानंतर आज मिलिंद एकबोटे पोलिस स्टेशनमध्ये हजर झालेत. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या दंगलीला मिलिंद एकबोटे कारणीभूत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर संघटनांनी केलाय. त्यामुळे मिलिंद एकबोटेंना अटक होणार का? किंवा त्यांच्यावर काय कारवाई होणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जातायेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live