दूध उत्पादकांचं आंदोलन सुरु, राज्यभर दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

दूधाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरवात झालीये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने दूध व्यावसाय अडचणीत आलाय. त्याला दिलासा देण्यासाठी प्रती लिटर पाच रूपयांचं सरकारने अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला एक थेंबही दूध जाणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

स्वाभिमानीने पुकारलेल्या दूध आंदोलनाची सुरवात पंढरपूरमधून झाली. रात्री 12 वाजता राजू शेट्टी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलेत, मात्र पोलीस आणि मंदिर व्यवस्थापनाने त्यांना श्री च्या मूर्तीवर अभिषेक घालण्यास मनाई केली. शेट्टी यांनी वारकरी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संत नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठू रखुमाईच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला. 

खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढ आंदोलन जाहीर केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटण्यासही सुरुवात झाली. माढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवून त्यातील हजारो लिटर दूध रस्त्यांवर ओतून दिलंय. माढा तालुक्यातील रिधोरे येथे दूध पिशव्याची वाहतूक करणारा टेंपो अडवून कार्यकर्यांनी पिशव्या रस्त्यांवर फेकल्या तर सांगोला तालुक्यातील महूद या गावात शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ दूध रस्त्यांवर ओतून दिले.

WebTitle : marathi news milk agitation in maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live