दूध दरवाढीच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

दूध दरवाढीच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत आज महत्वाची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षते खाली ही बैठक आयोजित केलीय. दरम्यान येणाऱ्या काळात टप्याटप्प्याने दूध दरवाढ करण्यात येणार असून पाच रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेर मिळणार असल्याचे राज्याचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

दूध दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलन पुकारलंय. दुधाची दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात राज्यातल्या शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी दूध ओतून, दुधाचे टँकर फोडून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. 

WebTitle : marathi news milk agitation meeting in delhi on milk rate

संबंधित बातम्या

Saam TV Live