आजपासून 25 रुपये लिटरने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी, तर..गोकुळचे दूध दोन रुपयांनी महागलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

आजपासून शेतकऱ्यांकडून 25 रुपये लिटरनं दूध खरेदी केली जाणार आहे. राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभरात केलेल्या दूध आंदोलनानंतर सरकारने  प्रती लिटर 25 रुपयांनी दूध खरेदीचा निर्णय घेतला होता. याचं पार्श्वभूमीवर आजपासून शेतकऱ्यांकडून 25 रुपये लिटरनं दूध खरेदी केली जाणार आहे

गोकुळचे दूध दोन रुपयांनी महागलंय

गोकुळचे दूध दोन रुपयांनी महागलंय. कारण खरेदी दरात दोन रूपयांनी वाढ झाल्यानं गोकुळनं दुधाच्या विक्रीदरातही वाढ केलीय. त्यामुळे आता म्हशीचं दूध 56 रूपये लिटरनं मिळणारंय, तर गायीचं दूध 45 रूपये लिटरनं मिळेल.

आजपासून ही नवीन दरवाढ लागू होणारंय. दूधाला दर वाढवून मिळावा यासाठी दूध उप्तादकांनी आंदोलन पुकारलं होतं त्यानंतर सरकारनं 25 रूपये दर देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दूधसंघांनीही आपले दर वाढवण्यास सुरूवात केलीय. 

WebLink : marathi news milk agitation milk rates maharashtra gokul doodh rate increased 

संबंधित बातम्या

Saam TV Live