महाराष्ट्रभरातील दुध आंदोलनाची परिस्थिती

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गिनिमी काव्याचा वापर केलाय. मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु करण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली होती. मात्र त्याआधीच अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आलीय. याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला आणि तो जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

पुण्यात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पणे आंदोलनाला सुरुवात केली. थेऊर  येथील चिंतामणी गणपतीची मध्यरात्री पुजा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुण्याकडे येणाऱ्या गोकुळचे 15 टँकर आणि सोनाईचे दुध टँकर स्वाभिमानी संघटनेने हडपसर येथून परत पाठवललेत.

दूध दरवाढीच्या प्रश्नावरुन महिलाही आक्रमक झाल्यात. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाईला दुधाचा अभिषेक केला. यानंतर त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली. सरकारने दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी केली. 

श्रीरामपूरच्या कारेगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुध आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गावातील ग्रामदैवत हनुमानाची रात्री 12 वाजता पुजा करून दुधाचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

दूध दरवाढीच्या आंदोलनाचं लोण, बुलडाण्यातही पोहोचलं... मलकापूर येथे अमर दूध संघाची गाडी अडवून, आंदोलनकर्त्यांनी गाडीच्या टायरमधील हवा सोडली... तर काही ठिकाणी दूधाच्या गाड्या फोडल्या. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आक्रमकपणे आंदोलनास सुरुवात केली आहे. 

दूध दरवाढीचे आंदोलन नाशिकमध्येही जोरात सुरू आहे... स्वाभिमानीचे नाशिक जिल्हाध्यक्ष गोविंद पगार आणि कार्यकर्त्यांनी वणी गडावर दूध ओतून, सरकारचा निषेध केला. दुपारी दूध उत्पादक शेतकरी घोटी टोलनाका बंद करुन आंदोलन तीव्र करणार आहेत.

तर तिकडे सांगलीतही पुणे-बंगळुरु महामार्गावर वाळवा तालुक्यातील केदारवाडी फाट्याजवळ दूध संघाचा टँकर फोडला. 

WebTitle : marathi news milk agitation raju shetty 

संबंधित बातम्या

Saam TV Live