दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 मार्च 2018

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही. दुधात भेसळ करणाऱ्यांना आता तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. राज्य सरकारनं विधिमंडळात तशी माहिती दिलीय. राज्य सरकार तर भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करण्यास तयार आहे. दूध संकलन, प्रक्रिया आणि वितरण या पातळीवर दुधाची भेसळ होत असल्याकडं आमदार राहुल कुल यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. शिवाय परराज्यातून य़ेणारं दूधही भेसळयुक्त असतं हा मुद्दाही आमदारांनी उपस्थित केला. लहान बाळापासून ते वृदधापर्यंत सगळेच दूध पितात. दुधातल्या भेसळीमुळं संपूर्ण समाजालाच दुष्परिणामांना सामोरं जावं लागलंय.

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही. दुधात भेसळ करणाऱ्यांना आता तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. राज्य सरकारनं विधिमंडळात तशी माहिती दिलीय. राज्य सरकार तर भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करण्यास तयार आहे. दूध संकलन, प्रक्रिया आणि वितरण या पातळीवर दुधाची भेसळ होत असल्याकडं आमदार राहुल कुल यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. शिवाय परराज्यातून य़ेणारं दूधही भेसळयुक्त असतं हा मुद्दाही आमदारांनी उपस्थित केला. लहान बाळापासून ते वृदधापर्यंत सगळेच दूध पितात. दुधातल्या भेसळीमुळं संपूर्ण समाजालाच दुष्परिणामांना सामोरं जावं लागलंय. दूधात भेसळ करून अमृततूल्य दुधाला विष बनवणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत उचलेलं हे पहिलं पाऊल स्वागतहार्य म्हणावं लागेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live