प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींची युती 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

एमआयएम पक्ष प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय.

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि भारिपचे माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. 2 ऑक्टोबरला असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक होणार असून याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या वंचित समाजाला न्याय मिळवून देईल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live