ओवेसींच्या सभांना रेकॉर्डब्रेक गर्दी झाली पण प्रत्यक्षात फायदा झालाच नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

महापालिका निवडणुकीत एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जळगाव व सांगलीत सभा घेतल्या होत्या. त्या सभांना मोठी गर्दी झाली होती. 

ओवैसींच्या सभेचे फळ जळगावात मिळाले. तिथे 3 नगरसेवक निवडून आले आहेत. मिरजमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. ओवैसी यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. तर आमदार इम्तीयाज जलील यांनी मिरजमध्ये औरंगाबादसारखे वातावरण असल्याचा दावा केला होता, मात्र त्यांना यश आले नाही. एमआयएमला आशा असलेल्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. 

महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जळगाव आणि सांगलीत जोरदार प्रचार केला होता; पण सांगलीत या सभांना गर्दी होऊनही ओवेसींच्या पक्षाला त्याचा फायदा झालेला दिसत नाही. 

ओवेसींच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 'एमआयएम'चे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. पण सांगली मिरज कुपवाडमध्ये त्यांच्या सभांचा प्रभाव पडला नाही. मिरजमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. त्यात ओवेसी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर सडकून टीका केली होती. 

'मिरजमध्ये औरंगबादसारखे वातावरण आहे', असा दावा आमदार इम्तियाज अली यांनी केला होता. पण 'एमआयएम'ला अपेक्षित असलेल्या चारही जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. 'राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची हत्या करणारे काय खात होते, याची चौकशी करा. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे काय खात होता, याची चर्चा का होत नाही', असा प्रश्‍न ओवेसी यांनी उपस्थित केला.

'काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांना सहावेळा माफीनामा लिहून देणारे 'त्यांचे' हिरो कसे होतात', असे वक्तव्यही त्यांनी केले होते. या सर्व प्रचाराचा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये 'एमआयएम'ला फायदा झालेला दिसून आलेला नाही. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live