मराठा आंदोलनात तरुणांवर दाखल झालेले किरकोळ गुन्हे मागे चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात तरुणांवर दाखल झालेले किरकोळ गुन्हे माघारी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची लवकरच कार्यवाही करू, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

सांगलीत चिंतामणी कॉमर्स महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मोहिते हाईट्‌स येथे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, महापौर संगीता खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक उपस्थित होते. मराठा मुलींसाठी सांगलीत सुरू झालेले राज्यातील हे पहिले वसतिगृह ठरले आहे. 

मंत्री पाटील म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षणानंतर मिळणाऱ्या सुविधा राज्य सरकार आताच देत आहे. ईबीसी सवलत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, वसतिगृहासह अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. महामंडळाच्या कर्जासाठी हमीही शासन देणार आहे. त्यासाठी विमा कंपनीशी करार होणार आहे. आरक्षणासाठी मागासवर्गीय अहवाल 15 नोव्हेंबरपूर्वी सकारात्मक येण्यासाठी प्रयत्नशील आहे.'' 

Web Title: minister chandrakant patil talks about maratha agitators

संबंधित बातम्या

Saam TV Live