निवडणुकीत कोण विजयी होणार यार लाखो रुपयांची पैज लावणाऱ्या दोन जणांना अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 एप्रिल 2019

मिरज -  लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावर लावलेली एक लाख रुपयांची पैज दोघांच्या अंगलट आली. दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी त्यांना अटकही झाली आहे. राजकुमार लहू कोरे ( रा विजयनगर ) आणि रणजीत लालासाहेब देसाई ( रा. शिपूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि निर्माण झालेली राजकीय सुरस यामुळे या निवडणुकीत नेमके कोण विजयी होणार याविषयी कोणत्याच पक्षाला अथवा नेत्यांना शाश्वती नाही. याचा अचूक लाभ काही जुगारी व्यक्तींनी घेतला आहे. जुगाराशी संबंधित शहरातील काहींनी राजकुमार लहू कोरे आणि रणजित लालासाहेब देसाई यांच्यात प्रत्येकी एक लाख रुपयाची पैज लावली. यासाठी मुद्रांकावर करारही करण्यात आला. हा करार नोटरींकडून साक्षांकित करण्यात आला. या करारामध्ये भाजपचे संजय पाटील निवडून आले तर रणजित  यांनी राजकुमार यांना एक लाख रुपये द्यायचे ठरले तर स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील विजयी झाले तर राजकुमार यांनी रणजित यांना एक लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत माध्यमांमध्ये चर्चा होताच पोलीसांनी यामध्ये हस्तक्षेप करत राजकुमार आणि रणजीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिरज ग्रामीण पोलीसात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. 

Web Title: in Betting case of election two arrested in Miraj

संबंधित बातम्या

Saam TV Live