मोदींनी सादर केलेली शायरी मिर्झा गालिब यांनी लिहिलेलीच नाही- जावेद अख्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 जून 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांना उघडे पाडले आहे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांना उघडे पाडले आहे

मोदींनी शायरीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला होता. तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना लक्ष्य केले होते. आझाद यांच्या टीकेला मोदींनी शायरीच्या माध्यमातून उत्तर दिले होते. गालिबनं अशा (आझाद यांच्यासारख्या) माणसांसाठी म्हटलं होतं, असं म्हणत मोदींनी एक शायरी ऐकवली. 'ता उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा,' असं मोदी म्हणाले होते. 

मोदींनी शायरीचा उल्लेख केल्यानंतर सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर अनेकांनी पंतप्रधानांची चूक दाखवून दिली. मोदींनी सादर केलेली शायरी मिर्झा गालिब यांनी लिहिलेलीच नसल्याच्या कमेंट अनेकांनी सोशल मीडियावर केल्या. प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनीदेखील यावर भाष्य केले. 'पंतप्रधान साहेबांनी म्हटलेला शेर मिर्झा गालिब यांचा नाही. तर तो सोशल मीडियावरुन आलेला आहे. खरं तर या शेरमधील दोन ओळी योग्य मीटरमध्येही नाहीत.

 

Web Title: In misquoting Ghalib PM Narendra Modi makes same mistake like everyone else


संबंधित बातम्या

Saam TV Live