मिशन अयोध्येमुळे संजय राऊत याचे प्रस्थ वाढले, वरिष्ठ शिवसेना नेते अस्वस्थ

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

मिशन अयोध्येच्या निमीत्ताने शिवसेनेला सेंटर स्टेजवर आणणाऱ्या संजय राऊत यांच्यावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे खुश असल्याचे समजते .पण या मिशन अयोध्येमुळे संजय राऊत याचे प्रस्थ शिवसेनेत  वाढल्याने  वरिष्ठ शिवसेना नेते  अस्वस्थ आहेत . 

शिवसेनेचे मिशन अयोध्या  संपूर्णत: संजय  राऊत   यांच्या निर्देशानुसार होत असल्याने ज्येष्ठ नेते संपूर्णत: अस्वस्थ झाले आहेत. मनोहर जोशी,लीलाधर डाके,दिवाकर रावते या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अयोध्येला येवू नका असे स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीवर बोलावून दिले आहेत.

राममंदिर अभियानाच्या निमित्ताने पक्षसंघटनेला बळकटी यावी यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय  आरती आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले.

अयोध्येत उदधव ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी धर्मगुरू हजर राहिलेत. त्या सर्वांशी संपर्क साधण्याचे कार्य संजय  राऊत यांनी केलं.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,पोलिस खाते यासर्वांशी संपर्क साधण्याचे काम  खासदार संजय राऊत यांनीच केले आहे.राममंदिरासाठी हाती घेतलेले अभियान केवळ  राऊत  यांच्या इच्छेनुसार चालते आहे त्यामुळे अन्य नेते, मंत्री अस्वस्थ झाले आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live