भारताने अंतराळातील LIVE उपग्रह पाडला; भारताचं मिशन शक्ती यशस्वी..  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 मार्च 2019

नवी दिल्ली : आज सकाळी (27 मार्च) भारताने एक मोठी कामगिरी केली असून, अंतराळातील एलईओ हा उपग्रह नष्ट करण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. भारतासाठी हा गर्वाचा क्षण, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आज सकाळी (27 मार्च) भारताने एक मोठी कामगिरी केली असून, अंतराळातील एलईओ हा उपग्रह नष्ट करण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश आहे. भारतासाठी हा गर्वाचा क्षण, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, की भारताने आज आपले नाव अंतराळात मोठे नाव केले आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनाच आतापर्यंत ही कामगिरी करता आली आहे. भारत हा चौथा देश आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा मोठा गर्वाचा क्षण आहे. एलईओ या उपग्रहाला आपल्या शास्त्रज्ञांनी ऩष्ट केले आहे. फक्त तीन मिनिटांत शास्त्रज्ञांनी ही कामगिरी केली आहे. मिशन शक्ती अंतर्गत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आले आहे. भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे. भारतात विकसित झालेल्या ए सॅट मिसाईलद्वारे ही कामगिरी करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्यांचे मी खूप अभिनंदन करतो. यांनी देशाचा मान वाढविला आहे, आपल्याला त्यांच्यावर गर्व आहे. आपले कृषी, संरक्षण, मनोरंजन, हवामान, शिक्षण, वैद्यकीय अशा क्षेत्रात आपल्या उपग्रहांचा फायदा होत आहे. या सर्व जागांवर उपग्रहांचा वापर केला जात आहे. 

मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटले आहे, की मेरे प्यारे देशवासियो, आज सकाळी 11.45 ते 12 या वेळेत महत्त्वपूर्ण संदेश घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया आणि रेडिओवरून ही घोषणा केली जाईल, असे म्हटले होते. मोदींनी यापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या या घोषणेकडे देशवासियांचे लक्ष होते.

Web Title : marathi news mission shakti accomplished says PM modi to the nation 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live